Sanjay Prabhakar PatilAbout the Author: या पुस्तकाच्या लेखकांचे मूळगाव जळगाव 32;िल्ह्यातील फैजपूर आहे. सध्या ते पालघर तालुक्यातील चिंचणी येथे वास्तव्यास आहेत. तेथेच के. डी अँड एम.के.ज्यु. कॉलेजमध्ये त्यांनी ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केले आणि आता ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा विषय भौतिकशास्त्र असला तरी लेखनात विशेष रुची असल्याने त्यांनी अनेक कथा, लेख आणि कविता लिहिलेल्या आहेत. त्यातील अनेक कथा या राज्यातील दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या अनेक कथांना पारितोषिके मिळालेली आहेत. लेखनासोबत त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी पाचशेपेक्षा जास्त व्यंगचित्रे काढली आहेत आणि ती व्यंगचित्रे निरनिराळ्या दिवाळी अंक तसेच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहेत. त्यांची काही व्यंगचित्रे ही दै सकाळ या वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या स्टोरीमिरर तसेच इतर ही सोशल मिडियावर अनेक कथा, चारोळ्या, कविता आणि एक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यांनी स्त्री आणि तिच्या व्यथा या विषयावर लेखन केलं आहे. त्यांची "पुरुष ते पुरुषच..!" ही कथा मालिका खूप वाचकांनी पसंत केली आहे. तसेच त्यांनी 'संगणक तुमचा मित्र' या पुस्तकाचे लेखन आणि 'समाज अभियंता' या पुस्तकाचे लेखन तसेच संपादन केले आहे . तसेच काही अंक आणि काही दिवाळी अंक यांचेही संपादन केले आहे.त्यांना डहाणू तालुक्यातील बी. एस. सी. एस. आणि रोटरी क्लब यांचेतर्फे "आदर्श शिक्षक पुरस्कारा" ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code
Hi! I'm Vidya, your virtual assistant.
Need a book recommendation, help with your order or support with any query? I’m here to assist you.